Welcome to 96 Kuli Maratha Marriage.com

आपल्या पसंतीचा जोडीदार शोधण्याची

आजच सुरुवात करूया ९६ कुळी मराठा मॅरेज समवेत...

96 Kuli Maratha Marriage

मराठा विवाह मध्ये लग्ना आधीच्या विधींची एक रोचक माहिती

मराठा विवाह (Maratha Marriage): हे भारतीय संस्कृतीतील अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे. मराठा मॅरेज मध्ये पारंपरिक रिती-रिवाजांचा महत्त्वपूर्ण ठाव असतो. मराठा समाजामध्ये मान्यता असलेल्या या विधी खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक विधीचा एक सुंदर अर्थ आहे. या विधी, वधू आणि वर यांना एकत्र आणण्यास मदत करतात. व एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यास मदत करतात.

लग्ना आधीच्या विधी (Maratha Marriage Pre-Wedding Rituals)

पत्रिका बघणे

मराठा विवाह (Maratha Marriage) मध्ये लग्न जुळवण्या आधी पत्रिका बघण्याचा कार्यक्रम करतात. या मध्ये वर आणि वधू ची पत्रिका जुळवली जाते. आणि गुण जुळणी च्या आधारावर लग्न जमवलं जातं. या नंतर शुभ विवाह ची तारिक ठरवून पत्रिका वाटल्या जातात.

गणेश पूजन

मराठा विवाहाच्या (Maratha Marriage) सुरुवातीला देवपूजा आणि गणेश पूजा केली जाते. हि विधी देवांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केली जाते. नवीन जोडप्याचं वैवाहिक जीवन सूज समृद्धी चा असावा या साठी देवांची पूजा केली जाते. देवांना पत्रिका देऊन लग्नासाठी आमंत्रण दिलं जातं. मराठा विवाहांमध्ये (Maratha Marriage) गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे, कारण गणेश पूजन केल्याने सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे.

सीमांत पूजन

पूर्वीच्याकाळात सर्व लग्न विधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे व-हाडी वधूच्या गावी येतात. त्यांचं स्वागत केला जातं. तिथे पूजन सुद्धा केलं जातं. या पूजेला सीमांत पूजन असे म्हणतात. मराठा विवाह (Maratha Marriage) परंपरा मध्ये ह्या विधी लग्नाच्या काही दिवसा आधी केल्या जातात. आजकाल हा विधी लग्नाच्या आदल्यादिवशी केला जातो. वधूचे आई वडील वराचे औक्षण करतात. त्याला नवे कपडे देतात. त्यानंतर वरमाई चे पाय धुतले जातात. त्यांना नवी साडी दिली जाते. ९६ कुळी मराठा विवाह (Maratha Marriage) मध्ये या संपूर्ण विधी ला सीमांत पूजन असे म्हणतात. या नंतर वराचे आई वडील वधूचे औक्षण करतात. तिला नवी साडी देतात आणि वधू नवी साडी धारण करून पुन्हा पूजेला बसते. वर्माच्या पाच फळांनीं वधू ची ओटी भरते आणि एकदा दागिना देते. यानंतर भोजनाचा कार्यक्रम असतो.

तेलफळ

मराठा विवाह (Maratha Marriage) मध्ये लग्नाच्या दिवशी मुलीच्या कुटुंबातील सुवासिनी वधू साठी तेलफळ आणतात. मुलगी वधू पासून लवकरच सुवासिनी होणार म्हणून तिला विवाहितेच्या वस्तू दिल्या जातात जसे कि हिरवी साडी, कुंकू, हिरवा चुडा, पायाचे पैंजण, जोडवे, चोळी, एखादा दागिना व ५ फळांनी तिची ओटी भरली जाते. पहिली ओटी गौरीहरापाशी भरावी असे शास्त्र आहे.

निष्कर्ष

या विधीच्या व्यतिरिक्त अजून काही विधी आहेत जसे कि गौरीहर पूजन, दैवक बसविणे, तेलवन पाडणे, आणि वारात. या विधींबद्दल संपूर्ण माहिती साठी आमचे इतर ब्लॉग्स नक्की वाचा. ९६ कुळी मराठा विवाह (Maratha Marriage) च्या या विधींबद्दल जाणून तुम्हाला काय वाटतं हे आम्हला नक्की कालवा. आणि ९६ कुळी मराठा विवाह (96 Kuli Maratha Wedding) परंपरा बद्दल आमचे इतर ब्लॉग्स सुद्धा वाचा. जर तुम्ही ९६ कुळी मराठा आहात आणि लग्नासाठी वर वधू च्या शोधात आहात तर 96kulimarathamarriage.com या वेबसाइट ला नक्की भेट द्या. धन्यवाद.