९६ कुळी मराठा म्हणजे काय?
What is 96 Kuli Maratha and 96 Kuli Maratha Surnames?
क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येउन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संपर्क होऊ नये म्हणून व्यवहार आणि कुठल्याही प्रकारची सोयरिक उपस्थित क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले. पुढे बर्याच प्रमाणात ही तत्त्व पाळली ही गेली. त्या वेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या ९६ होती म्हणून ही कुळे स्वतःला ९६ कुळी मराठा असे संबोधू लागले. ह्या कुळांना बर्याच शतकांपासून राजवंशाची मान्यता मिळालेली आहे. ९६ कुळे ही आडनावे आहेत परंतु बर्याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, किंवा पूर्वी मिळलेली पदवी अशा स्वरुपातून पुढे आलेले असते, म्हणून खरे आडनाव (कुळी) स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत करुन देणे हे आपले कर्तव्य आहे असे या कुळातील लोक समजतात.
Who Are 96 Kuli Maratha? (कोण आहेत 96 कुळी मराठा?)
हि ९६ कुळे ५ प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे- यादव / जाधव, सोलंकी / सोळंके, चव्हाण, मोरे, भोसले
ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साम्य दाखविते. ह्यातील ९६ कुळी म्हणजे ९६ कुलाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत. ह्यांच्या आडनावांचा शोध घ्यायला गेल्यास अत्यंत रंजक माहिती आपल्याला मिळते. जवळ जवळ ३४८७ आडनावे शोधली गेली आहेत जी स्वत:ला ९६ कुळी मानतात. अहिर, भाती, भोसले, चालुक्य, चव्हाण, चंदेला, गायकवाड, गुज्जर, कादंबास, काकतीय कलचुरी, चेदीवंशीय, मराठा मौर्य (मोरे), नाला निकुंब, निकम, पल्लव परिहार, पवार पाल्मर, राष्ट्रकुट शंखपाल, संकपाळ, सावेकर, सातवाहन सिंदिया, शिंदे, सिल्हारा सिसोदिया साळुंके, ठाकोरे, वाघेला, वात्कारा, यादव इत्यादी.
९६ कुळी मराठ्यांची एक वेगळी अशी परंपरा आहे. ह्यांच्यामध्ये लग्नासाठी कुळ महत्वाचे असते. त्यामध्ये काही ठराविक आडनावाच्या मराठ्यांचे दुसऱ्या ठराविक आडनावाच्या मराठ्यांशी व्यवहार अथवा सोयरिक होत नाही. त्यामुळे या कुळातील लग्न ठरविताना आडनाव आणि गाव महत्वाचे असते.
आजच्या बदलत्या जगात, 96 कुळी मराठा समाज देखील बदलत आहे. शिक्षण, रोजगार आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा या समाजावर मोठा प्रभाव पडला आहे. आजही, काही कुटुंबांमध्ये लग्नासाठी कुळ आणि गोत्राचा विचार केला जातो, परंतु अनेक कुटुंबांमध्ये शिक्षण, संस्कार आणि गुणधर्म हे लग्नाच्या प्रमुख घटक मानले जातात.
या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन आणि प्रत्येक नागरिक आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. तेव्हा मराठा समाजासाठी प्रत्येक मराठा बांधवांचे असलेले कर्तव्य लक्षात घेता, आम्ही ९६ कुळी मराठा तरुण / तरुणीं साठी विवाह नोंदणी करीता "९६ कुळी मराठा मॅरेज. कॉम" हे ऑनलाइन विवाह मंडळ घेऊन आलो आहे. येथे तुम्हाला आपल्या मनपसंतीची स्थळे बघायला मिळतील. आमच्या ऑनलाइन विवाह मंडळाच्या वेबसाईट आणि अँप मध्ये वर आणि वधूच्या स्थळांची माहिती तपशीलवार दिलेली आहे. यामध्ये स्थळाचे वय, शिक्षण, व्यवसाय, शहर, स्वरूप, वैयक्तिक वैशिष्ट्ये इत्यादींचा समावेश आहे. यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य स्थळ निवडणे सोपे होते. तरी आजच रजिस्टर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा.
हजारो नोंदणीकृत प्रोफाईल्स मधून निवड करा अनुरूप व सुयोग्य स्थळांची
- 96 kuli Maratha Marriage
- What Is 96 Kuli Maratha
- What Is 96k Maratha
- Who Are 96 Kuli Maratha
- 96 kuli maratha surnames